TSK

TSK · योहा 5:27

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.

तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.

‹पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.›

त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.

¶ त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.

थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस