TSK

TSK · योहा 6:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ परमेश्वर तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.

जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.”

येशू त्यांना म्हणाला, ‹“तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”› ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.

ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.

आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जगाचा तारणारा आहे, हे आम्हास समजले आहे.”

मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’