परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
TSK
TSK · योहा 9:22
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय? ते कळते व जे तुम्हा लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे, ते तुम्ही माझे ऐका! मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका, किंवा त्यांच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका.
तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस? तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस. मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरीही तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही.
¶ ‹“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.›
तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे.
त्यांनी त्यास म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि तू आम्हास शिकवतोस काय?” आणि त्यांनी त्यास बाहेर घालवले.
‹ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.›
¶ त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, ‹“तुम्हास शांती असो.”›
आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत,
¶ आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.