TSK

TSK · यहो 21:44

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

“मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल.

त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील.

तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.

परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”

परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.

परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएल लोकांस वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.

मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले.

इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.