सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.
TSK
TSK · यहू 1:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयिम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो. तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.
सदोमावर कोणी हात टाकला नाही तरी त्याचा अकस्मात नाश झाला, त्याच्या पापांपेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे. सदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा हात नव्हता.
हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
‹पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”›
‹जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.›
¶ या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले;
जर त्याने सदोम व गमोरा या नगरांची राख करून त्यांना नाशाची शिक्षा दिली व पुढे जे लोक अभक्तीने वागतील त्यांच्यासाठी त्यांचे उदाहरण ठेवले,