TSK

TSK · शास्ते 1:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.

ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”

आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”

हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.

¶ तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो,