नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
TSK
TSK · विला 2:14
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही! राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.”
“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.
तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तलवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हास या ठिकाणी खरी सुरक्षितता देत आहे.”
कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते, तर ते माझ्या लोकांस माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून आणि कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.”
¶ परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात.
¶ आणि तुम्ही आपले संदेष्टे, आपले ज्योतिषी, आपले स्वप्नद्रष्टे आणि आपले मांत्रिक आणि आपले जादूगार, जे तुम्हास म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, त्यांचे तुम्ही ऐकू नका.
¶ जे कोणी संदेष्टे तुम्हाशी बोलतात आणि म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, कारण ते तुम्हास खोटे भविष्य सांगतात.
¶ कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “तुमच्यामध्ये असलेले तुमचे संदेष्टे आणि ज्योतिषीह्न्जी यांनी तुम्हास फसवू नये आणि तुम्ही ज्यास आपली स्वप्ने पाहण्यास लावता त्याचे तुम्ही ऐकू नका.
तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?
मानवाच्या मुला इस्राएलाच्या भाकीत करणाऱ्या विरूद्ध भाकीत कर आणि जे आपल्या बुध्दीने भाकीत करतात त्यांना सांग, परमेश्वर देवाचा शब्द ऐका.
तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.
जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की, “मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,” तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.
तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत. तिच्या याजकांनी पवित्र गोष्टी अपवित्र केल्या आहेत आणि नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे!