TSK

TSK · विला 3:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.

मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.

लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले.

लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.

मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?

“जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले, या माझ्या दु:खा सारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.