TSK

TSK · विला 3:40

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.

तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”

जर तो मनुष्य देवाला म्हणेल की. मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.

मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.

दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.

मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.

म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ, आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.

“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.”

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः “आपल्या मार्गाकडे लक्ष द्या!

उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.

परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.