TSK

TSK · विला 3:48

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.

जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.

म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन. माझे डोळे खात्रीने अश्रू गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.

या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”

“त्यांचे हृदय परमेश्वराचा धावा करत आहे. हे सियोनकन्येच्या तटा, तुझे अश्रू नदीच्या प्रवाहाप्रमाणे रात्रंदिवस वाहत राहो. त्यास अटकाव करू नको. तुझ्या डोळ्यातील बाहुलीस विसावा देऊ नको.