¶ त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातून सुटका होऊन प्रांतात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत आणि त्यांची अप्रतिष्ठा होत आहे, कारण यरूशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे आणि तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
TSK
TSK · विला 5:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ आमच्या देवा, ऐक कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्यामस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदीवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो.
मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का?
हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे. तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण.
तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझे दु:ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”
हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु:खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे. माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे.
परमेश्वरा, पाहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव. स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?
त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.
नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.”