आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरून ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”
TSK
TSK · लेवी 10:17
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.
¶ तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
¶ परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.
मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
¶ दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.