TSK

TSK · लेवी 16:32

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत

अहरोनाच्या जागी त्याचा जो पुत्र याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपामध्ये जाताना ती वस्रे सात दिवस घालावीत.

मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे.

त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.