¶ तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
TSK
TSK · लेवी 18:24
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
तुम्ही फार चांगले आहा आणि योग्य मार्गाने जगता म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे.
अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतांत पाठवले. कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
“मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत.
‹मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’›