¶ जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.
TSK
TSK · लेवी 19:5
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
¶ एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.