TSK

TSK · लेवी 8:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव.

¶ तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांस एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.

¶ राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाहीत इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बली अर्पण केले.

दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.

¶ सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांस दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.

¶ नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.