TSK

TSK · लूक 11:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.

तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”

¶ पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा;

¶ कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून,