TSK

TSK · लूक 20:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते? चांगले द्राक्ष यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता, त्याने का रानद्राक्षे उत्पन्न केले?

¶ कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”

हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.

तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”

मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”

पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.

पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,