TSK

TSK · लूक 22:55

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.

जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.

शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.

¶ यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.”

दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.

¶ शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”

ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?