TSK

TSK · लूक 22:61

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.

खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.

मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत:चाच द्वेष कराल.

येशू त्यास म्हणाला, ‹“मी तुला खरे सांगतो आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”›

आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, ‹“माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?”›

प्रभूने उत्तर दिले, ‹“मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.›

येशूने त्यास उत्तर दिले, ‹“माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”›

¶ म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.