TSK

TSK · लूक 22:62

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.

हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.

खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.

“मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.

नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, ‹“कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”› यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.