त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात.
TSK
TSK · लूक 23:34
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल, कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.
¶ मग येशू म्हणाला, ‹“हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.›
त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.
‹आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.›
‹मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.›
¶ मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता.
मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका.
आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे.