TSK

TSK · लूक 23:45

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.

निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या लोकरीचा व तलम सुताचा पडदा करून घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.

¶ तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.

आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते,

¶ म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.