TSK

TSK · लूक 6:42

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?

जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.

¶ ‹अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.›

येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, ‹“ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?›

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.

¶ तेव्हा दुसर्‍याला दोष लावणार्‍या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.

हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली;

म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.

ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे;