TSK

TSK · लूक 8:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”

जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.

‹तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय?›

आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, ‹“अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”›

तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?”›

येशूने तिला म्हटले, ‹“तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”›