आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला.
TSK
TSK · लूक 8:43
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
¶ आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती.
नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, ‹“किती काळ हा असा आहे?”› वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.
तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता.
तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”
कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.