TSK

TSK · लूक 9:60

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, ‹“योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?”› तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, ‹“माझी कोकरे चार.”›

¶ म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.

आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.

¶ ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.

पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.