¶ पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या,
TSK
TSK · मला 2:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.
हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
¶ राजा शलमोनाचे अनेक विदेशी स्त्रिंयावर प्रेम जडले होते. फारोच्या मुलीखेरीज, हित्ती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा.
¶ त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती.
परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.
मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले.
मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल.
ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी घृणास्पद वर्तन केले आहे. ज्या पुरुषाने आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले; असा पुरुष ज्याने आपल्या वडिलाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले ते सर्व कृत्ये तुझ्यामध्ये झालेले आहे.
¶ विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?