TSK

TSK · मला 4:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.

¶ “पाहा! मी माझा दूत पाठवत आहे, आणि तो माझ्यापुढे मार्ग तयार करील. आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्याच्यात तुम्ही आनंदी होता, तो कराराचा दूत, अचानक आपल्या मंदिरात येत आहे. पाहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”

‹कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले.›

जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.”

आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.

आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते,

आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलीया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?”

कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?