TSK

TSK · मार्क 14:38

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, ›

‹तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.”›

‹यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”›

तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही का झोपत आहात? उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”›

¶ सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा.

¶ म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.

¶ ‹जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.›