TSK

TSK · मार्क 15:26

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याची तुमच्यावर प्रीती होती.

खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.

परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.

हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.

आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले.

आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”