TSK

TSK · मार्क 2:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.

परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.

दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.

येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, ‹“तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?›

पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता?›

तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.”

असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता.

तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, ‹“योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?”› पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, ‹“माझी मेंढरे चार.”›

तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.

‹तर मी तिच्या अनुयायीरूपी मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे. मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.›