TSK

TSK · मार्क 5:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तेसुध्दा अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मरण पावलेल्या डुकराला स्पर्शही करु नका.

जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.

तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली.