TSK

TSK · मार्क 8:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.

त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर.

¶ दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.

¶ त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली.

‹मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?”›

¶ नंतर त्यांनी त्यास चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व काही हेरोदी लोकांस त्याच्याकडे पाठवले.

‹मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”›

¶ देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.

¶ लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.