TSK

TSK · मत्त. 11:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.

ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात.

¶ नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.

‹मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र!›

¶ सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.

येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते.

आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.

जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,

म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.