TSK

TSK · मत्त. 11:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांनी त्यास उत्तर दिले, “त्याने केसांचा बनवलेला अंगरखा घातला होता आणि कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.” तेव्हा अहज्या म्हणाला, “तो एलीया तिश्बीच आहे.”

¶ त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टांताची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांस फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत.

अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”