TSK

TSK · मत्त. 20:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.

मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.

तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा.

¶ प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.

¶ मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”

येशू म्हणाला, ‹“ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?”› परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”

‹“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, › ‹कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास› ‹त्याने मला अभिषेक केला आहे.› ‹कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, › ‹आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, › ‹ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी›

¶ तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.

ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.