परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.
TSK
TSK · मत्त. 23:35
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही.
मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.
गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.
त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले.
¶ पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे,
¶ विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.