TSK

TSK · मत्त. 24:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.›

‹जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे.”›

असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, ‹“संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.”›

येशूने सांगितले, ‹“आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, › ‹‘मी मेंढपाळाचा वध करीन, › ‹कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’›

‹भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.›

¶ त्याच्या शिष्यांतील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, “हे वचन कठीण आहे; हे कोण ऐकून घेऊ शकतो?”

¶ आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.

¶ पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.