TSK

TSK · मत्त. 27:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल.›

मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, ‹“तू म्हणालास, तसेच आहे.”›

येशू म्हणाला, ‹“मी आहे, › ‹आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ› ‹देवाच्या उजवीकडे बसलेले› ‹व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”›

व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”

जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.