TSK

TSK · मत्त. 3:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.

देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;

¶ त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टांताची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांस फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत.

‹तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात.›

योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.

आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”