TSK

TSK · मत्त. 5:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.›

‹परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.›

¶ ‹परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.›

‹ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली.›

‹जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.›

‹त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.›

अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.

आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे.