TSK

TSK · मत्त. 6:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.”

पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,

पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे.

¶ परंतु येशूंनी उत्तर दिले, ‹“कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, › ‹‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, › ‹देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”›

आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’

जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.