दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
TSK
TSK · मत्त. 6:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.
“जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले.”
जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.”
ते संदेष्ट्यांना आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरातील याजकांना म्हणाले: “प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही उपवास करून शोक प्रकट करत आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?”
¶ ‹म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.›
¶ मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”
ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
¶ कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.”
पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;