TSK

TSK · मीखा 2:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसांमागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील पण ती सापडणार नाहीत, आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.

¶ मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.

परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी.

त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.

हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.

हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.

कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.

त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो.

परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.

कारण निर्दयींचा अंत होईल आणि उपहास करणारा नाश होईल. दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे सर्व काढले जातील.

कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते.

¶ परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात.

त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.

विधवा, अनाथ, परके व गरीब यांना छळू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.”

¶ पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.

मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.

¶ मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.

निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे,