TSK

TSK · मीखा 2:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.

काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.

पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.

मानवाच्या मुला आपले तोंड दक्षिणेच्या भूमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकीत कर.

“पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले, आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.

परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत, तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल.”

परंतु हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की, यापुढे तुम्ही या नावाने कोणाशीही बोलू नये.”

¶ तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले, त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.

त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;