TSK

TSK · मीखा 6:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.

¶ परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.

दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.

भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.

लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.

पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.

व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत, फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.

परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत.”

कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो.

¶ तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.

¶ धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.