TSK

TSK · मीखा 7:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.

बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.

जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.

पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.

त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”

माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.

परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले.