TSK

TSK · मीखा 7:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.

म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील.

तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.

¶ तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले, “नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,

¶ पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.

परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या कर्माच्या फळाप्रमाणे मी तुम्हास शिक्षा करीन. आणि मी तिच्या वनात अग्नी पेटवीन तेव्हा ते सभोवतीचे सर्वकाही जाळून टाकेल.”

¶ तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.

¶ जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे, जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल.

म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.

¶ फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल.