तरीही यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
TSK
TSK · नहे 2:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.
पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे, तो पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरूशलेमेला पोहोंचला.
¶ मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरूशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरूशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.”
¶ मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.
राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो.
आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले.
परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.